भारतात घडणाऱ्या जमावहत्येच्या सर्व घटनांमधून स्वयंप्रतिकाराचा रोग दिसतो!
स्वघोषित बंड पुकारणं आणि आपल्याच शरीराच्या अवयवाचं जैविक अस्तित्व नाकारणं, याचं समांतर उदाहरण आज आपल्याला भारतीय राजकारणात-समाजकारणात दिसतं आहे. देशाच्या शरीराचा भाग असलेले अल्पसंख्याक आज केंद्रीय नेतृत्वाला धोका वाटू लागलेले आहेत. फरक इतकाच की, इथं कुठलाही जीवघेणा अपघात घडलेला नाही आणि गोंधळाचे संदेश म्हणजे धार्मिक आणि आर्थिक असुरक्षितता आहेत, ज्या कल्पित आहेत आणि मुद्दाम पसरवल्या जात आहेत.......